शरद पवारांचे फोटो का वापरता? असा सवाल करत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावलं होतं. अशातच आज (17 मार्च) सुप्रीम कोर्टात अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यापुढे शरद पवारांचे फोटो वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून सादर करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवारांचे फोटो वापरले जात असल्याच्या मुद्द्यावरून कोर्टात विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांचे फोटो का वापरता? असा सवाल सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला केला होता. तसेच यापुढे शरद पवारांचे फोटो वापरणार नाही, असे लिखित द्या, असे आदेश कोर्टाने अजित पवार गटाला दिले होते. त्यानंतर आज यासंदर्भात अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचे असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाकडून या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. त्यामुळे आता या याचिकेवर 19 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.