बिग बॉस’ फेम एल्विश यादव सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे एल्विश यादव अडचणीत आला आहे. नोएडामधील रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विष तस्करी प्रकरणात आज चौकशी केल्यानंतर नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवला अटक केली आहे.
सापांच्या विष तस्करी प्रकरणी गेल्या वर्षी नोएडा पोलिसांनी सेक्टर 39 मध्ये एफआयआर नोंदवला होता, त्यानंतर आज एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तर काही वेळाने एल्विश यादवला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बँक्वेट हॉलवर छापा टाकून 4 सर्पमित्रांसह 5 जणांना अटक करून 9 साप आणि त्यांचे विष जप्त केले आहे. तर नोएडा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एल्विश यादववर आरोप करण्यात आले आहेत की तो पार्टी आणि क्लब्समध्ये सापाचे बाईट म्हणजेत स्नेक बाईट पुरवायचा.
दरम्यान, आपल्या देशामध्ये असे काही करणे म्हणजे एक प्रकारचा गु्न्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी एल्विश विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एल्विशची एकदा चौकशी केली होती. मात्र, त्याने दिलेल्या उत्तरांमुळे पोलीस संतुष्ट नाही आहेत, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.