अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ड्रग किंगपिन जफर सादिक याला दिल्लीहून चेन्नईत आणले आहे . तपास पथक सकाळपासून एनसीबी झोन कार्यालयात त्याची चौकशी करत आहे. जफर सादिक याला सॅन्थोममधील अरुलानंदम रस्त्यावरील त्याच्या घरी किंवा पेरुंगुडी येथील त्याच्या गोदामातही नेले जाऊ शकते.
तामिळ चित्रपट निर्माता आणि DMK ने निष्कासित केलेला जफर सादिक याने गेल्या तीन वर्षात 2000 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मास्टर ब्रेन म्हणून काम केले आहे. ,त्याने मल्टी-ग्रेन मिक्स आणि किसलेल्या नारळातून ड्रग्स गेल्या तीन वर्षांत परदेशात पाठवले असल्याची माहिती समोर आली होती. .एनसीबीने जाफरला 9 मार्च रोजी दिल्लीत अटक केली. तो सुमारे तीन आठवडे फरार होता.
एनसीबीसमोर हजर न राहिल्यामुळे त्याच्या साथीदारांना फेब्रुवारीमध्ये दिल्लीत अटक करण्यात आली होती. सादिक फरार असताना न्यायालयाच्या आदेशानुसार एनसीबीच्या पथकाने त्याच्या अनुपस्थितीत सॅन्थोम येथील घराचे कुलूप तोडून झडती घेतली होती .