लोकसभा निवडणुकीदरम्यान एखाद्या गावातील आचारसंहिता भंग केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका पोलिस पाटील यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्यास तथा संबंधित कर्मचाऱ्यानी कार्यालयाला उपस्थितीबाबत माहिती न दिल्यास त्या कर्मचाऱ्यावर थेट कारवाईचे निर्देश संबंधित खात्याला दिले आहेत.
निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे योग्य पालन व्हावे, यासाठी अनेक पावले उचलली आहेत. कोणत्याही गावात संबंधित उमेदवारांचे फलक लावताना प्रथम परवानगी महत्त्वाची आहेत. अशा गावातून एखादी तक्रार आचारसंहिता भंग करण्यासंदर्भातील झाली, तर त्वरित कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
एसएमएस’द्वारे माहिती
कर्मचाऱ्याला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणापासून तर प्रत्येक कार्याची माहिती ‘एसएमएस’द्वारे निवडणूक विभाग देणार आहे. त्यामुळे ‘एसएमएस’ न पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता प्रत्येक मेसेज चेक करावे लागेल.