केरळमधील पलक्कड, मलप्पुरम आणि पोन्नानी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (19 मार्च) पलक्कड येथे येणार आहेत.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटोनी यांचा मुलगा अनिल के. अँटोनी यांच्या प्रचारासाठी 15 मार्च रोजी पथनामथिट्टा जिल्ह्यात पोहोचले आणि तेथे रोड शो केला होता. तर पंतप्रधानआज सकाळी 10:00 वाजता हेलिकॉप्टरने मर्सी कॉलेजच्या मैदानावर पोहोचले आहेत. तसेच त्यानंतर ते’कोट्टा मैथनम’ या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी अंचुविलक्कू ते हेड पोस्ट ऑफिस रोड असा सुमारे एक किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि राज्यातील एनडीएचे उमेदवारही उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष एन हरिदास यांनी सांगितले की, या रोड शोमध्ये सुमारे 50,000 लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. तसेच सायंकाळनंतरही सुरक्षा तपासणी सुरू आहे.