तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली लोकसभा निवडणुकीची मागणी केली आहे. तसेच भाजपा भारतीय निवडणूक आयोग नष्ट करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भाजपावर टीका केली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रॉल लँडस्केपमध्ये फेरफार देखील केल्याचा आरोप डेरेक ओब्रायन यांनी केला आहे.
”भाजपा करत असलेले घाणरेडे राजकारण हे निवडणूक आयोगांसारख्या संस्था नष्ट करत आहे. लोकांचा सामना करण्यास भाजपा इतकी घाबरली आहे का? की, ते विरोधी पक्षांना निशाणा बनवण्यासाठी निवडणूक आयोगाचे रूपांतर पक्ष कार्यालयात करत आहे. ECI किंवा HMV ला लक्ष्य करण्यासाठी ECI ला पक्ष कार्यालयात रुपांतरीत करत आहेत? निवडून आलेल्या राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या! मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली होईल हव्यात.” राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी ‘एक्स’ वर लिहिले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने डीजीपी राजीव कुमार यांची बदली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पश्चिम बंगालचे डीजीपी रवीव कुमार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन आयपीएस अधिकारी विवेक सहाय यांच्या जागेवर नियुक्ती केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ECI ने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांचे समर्थन करण्यासाठी बंगालचे डीजीपी आणि सहा राज्यांच्या गृह सचिवांची बदली करण्याचे पाऊल उचलल्याचे ईसीआयने म्हटले आहे.