सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरात तयारी केली आहे. तर येत्या 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यासाठी आजपासून (20 मार्च) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.
21 राज्यांसोबतच एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक 102 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये अंदमान आणि निकोबार, दिल्ली, अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, चंदीगड, गुजरात, गोवा, हरयाणा, लडाख, लक्षद्वीप, केरळ, मेघालय, मिझोराम, मेघालय, नागालँड, पंजाब, सिक्कीम, पद्दुचेरी, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. तसेच उमेदवारी अर्ज भण्याचा शेवटचा दिवस 27 मार्च आहे. त्यानंतर 28 मार्च रोजी उरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे.
दरम्यान, 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर याचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे.