सध्या देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. एनडीए आणि ‘इंडी’ आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. हजारो कोटींच्या विकासकामांचे उदघाटन त्यांनी केले आहे. आता आचारसंहिता लागू झाली आहे. सध्या भारत मंडपम येथे ‘स्टार्टअप महाकुंभ’ सुरू आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दशकांमध्ये भारताने आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. आता आपण भारतात नवोन्मेष आणि स्टार्टअप संस्कृतीचा कल सतत वाढत असल्याचे पाहत आहोत.
‘स्टार्टअप महाकुंभ’ मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. १.२५ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत, जे १२ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देतात. देशात ११० पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत. आमच्या स्टार्टअपने १२,००० पेक्षा जास्त पेटंट नोंदवले आहेत. स्टार्टअपमध्ये ४५ टक्के महिलांचे नेतृत्व आहे. स्टार्ट अप इंडिया मोहिमेअंतर्गत, देशाने नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्यांना निधीच्या स्रोतांशी जोडले. यासह, आज संपूर्ण देश अभिमानाने सांगू शकतो की आमची स्टार्ट अप इकोसिस्टम केवळ मोठ्या मेट्रो शहरांपुरती मर्यादित नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व देशातील लहान शहरातील तरुण करत आहेत.”
उद्योजकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, ”बरेच लोक स्टार्टअप सुरू करतात, परंतु राजकारणात असे बरेच घडते आणि पुन्हा पुन्हा सुरू करावे लागते. तुमच्यात आणि त्यांच्यातील फरक हा आहे की तुम्ही प्रायोगिक आहात, जर एक सुरू होत नसेल तर तुम्ही लगेच दुसऱ्याकडे जाता. भारताच्या युवा शक्तीची क्षमता आज संपूर्ण जग पाहत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या क्षमतेवर विसंबून, देशाने स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत.”