दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी अनेक समन्स पाठवले आहेत. मात्र एकही समन्सला अरविंद केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सविरुद्ध दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी तुम्ही तपास यंत्रणांसमोर का उपस्थित होत नाही असा सवाल कोर्टाने त्यांना विचारला. यावर आम्हाला संरक्षण हवे असल्याचे केजरीवालांच्या वकिलांनी सांगितले. त्यावर सध्या कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे.
आम्हाला ईडीसमोर सामोरे जाण्यास काहीही अडचण नाही , मात्र आम्हाला अटक होण्याची शक्यता आहे असे, अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिघवी यांनी कोर्टात सांगितले. आतापर्यंत आम्हाला १० समन्स आल्याचे वकिलांनी कोर्टासमोर सांगितले. आमहाला ईडीसमोर हजर होण्यास अडचण नाही फक्त आम्हाला अटकेपासून संरक्षण हवे आहे असे वकिलांनी सांगितले. ईडीने दिलेले समन्स कायदेशीर नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने आतापर्यंत तब्बल १० समन्स बजावले आहेत. या सॅम्सनमधून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीआधी मला अटक करण्याचे षडयंत्र आहे असा आरोप देखील केजरीवालांनी केला होता. तसेच अरविंद केजरीवालांनी ईडीच्या समन्सला हायकोर्टात आव्हान दिले होते. ईडीचे सॅमसन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असा आरोप केजरीवालांनी केला आहे.