प्रबोधन मंच*आणि *Centre for Intergral Studies and research आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ‘एकात्म मानव दर्शन परिचय’-संपादक -श्री. रवींद्र महाजन*, आणि *’समाज जीवन सुयोग्य दिशा’ (एकात्म मानव दर्शनाच्या प्रकाशात तत्त्व, व्यवहार व परिवर्तन) संपादक : श्री.रवींद्र महाजन, प्रा. श्यामकांत अत्रे*
या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते शुक्रवार दि. १५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी भारतीय विचार साधना, सदाशिव पेठ येथे पार पडले.
“ज्यू, इस्लाम, इसाई इत्यादी अब्रहामिक पंथामध्ये समान प्रेषित परंपरा असून टोकाचा रक्तरंजीत संघर्ष पाहायला मिळतो. भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्या संघर्षाच्या काळात, भारतातील वैदिक, बौद्ध,जैन अशा विविध विचार प्रवाहांच्या जीवनमूल्यांना सामवून घेणारे एकात्म मानव दर्शन हे समग्र विचार दर्शन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्याला दिले. एकात्म मानव दर्शन हे आपण व्यवहारात कसे वापरतो हे देखील पाहिले पाहिजे. आपण जगतिक पातळीवर विचार करणे आवश्यक आहे. तसेच महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी समतापूर्ण जीवनासाठी उपनिषदांकडे पहा असे देखील सांगितले आहे कारण त्यात चराचराला ब्रम्ह म्हणले आहे. असे प्रतिपादन डॉ सदानंद मोरे यांनी केले.
पाश्चात्य जीवन मूल्य आणि पश्चात्य संशोधन मेथडोलॉजी याला पंडितजीचा आक्षेप होता. त्यामुळे भरतीय विचार दर्शनावर आधारित सर्वांगीण समाज रचना हा एकात्म मानव दर्शनाचा गाभा आहे असे प्रतिपादन मा. प्रा.श्यामकांत अत्रे यांनी केले. या पुस्तकामधून सोप्या शब्दात एकात्म मानव दर्शनाचा परिचय करुन दिला असून एका गहन तत्वज्ञानाची रचनात्मक माहिती या पुस्तकामधून होईल असे मा. रवींद्र महाजन यांनी सांगितले. या कार्येक्रमास प्रबोधन मंचाचे अध्यक्ष मा. हरिभाऊ मिरासदार, उपाध्यक्ष किशोरजी शशितल,लेखक अभिजित जोग आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. अजय महाजन यांनी प्रास्ताविक केले. श्री. प्रतीक कांचन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. श्री.अभिजित देशमुख यांनी कार्येक्रमाचे सूत्रसंचालन केले. दोन्ही पुस्तके भाविसा केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.