पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क साधला.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि मित्र असलेल्या रशियन लोकांच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.
येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्यांवरील प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाणही केली.
रशिया – युक्रेन संघर्षावर चर्चा करताना, भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूनेच असल्याच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. दोन्ही नेत्यांनी कायम संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे