क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी (21 मार्च) सांगितले की, 2030 युवा ऑलिम्पिक आणि 2036 ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारत आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. या कार्यक्रमाचे यजमानपदाचे निमंत्रण मिळताच भारत यजमानपदासाठी तयार असेल, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘भारत 2030 युवा ऑलिम्पिक आणि 2036 ऑलिम्पिकचे यजमानपदासाठी सज्ज आहे. आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत आणि आपल्याकडे युवाशक्ती आहे. तसेच खेळांसाठी भारतापेक्षा मोठी बाजारपेठ नाही, असेही ते म्हणाले.
पुढे सांगितले की, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी पाहण्यासाठी ब्रिटनमधील सुमारे 4000 क्रिकेटप्रेमी धर्मशाला येथे पोहोचले होते आणि त्यांनी स्टेडियमचे कौतुकही केले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर, 2028 ऑलिम्पिक लॉस एंजेलिसमध्ये आणि 2032 ऑलिम्पिक ब्रिस्बेनमध्ये खेळले जातील, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.