दिशाभूल करणाऱ्या जाहीरात प्रकरणी पतंजलीने सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) माफी मागितली आहे. पतंजली (Patanjali) आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी पतंजली उत्पादनांच्या भ्रामक दाव्यांबाबत सर्मोच्च न्यायालयाच बिनशर्त माफी मागितली आहे. (Patanjali Apologized To The Supreme Court)
2 एप्रिल रोजी बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर एका दिवसानंतर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात पतंजली एमडी बाळकृष्ण यांच्या माफीचा समावेश करण्यात आला. “कंपनीच्या अपमानास्पद वाक्ये असलेल्या जाहिरातीबद्दल आम्हाला खेद वाटतो”, असे बाळकृष्ण यांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
आज (21 मार्च) आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, पतंजली कंपनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी खेद व्यक्त करते. भविष्यात पुन्हा अशा जाहिराती दिल्या जाणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ.
सर्वोच्च न्यायालयाने 27 फेब्रुवारी रोजी पतंजली आयुर्वेदला मधुमेह, रक्तदाब, संधिवात, दमा, लठ्ठपणा यांसारख्या आजारांवरील औषधांच्या जाहिराती प्रकाशित करण्यास मनाई केली होती. तसेच न्यायालयाने आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली विरूद्ध अवमानाची नोटीस बजावली आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2023 मध्ये पतंजलीने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले होते की, ते वैद्यकीय कार्यक्षमतेबद्दल कोणतेही विधान किंवा दावे, टीका करणार नाहीत. मात्र, तरीही पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरूच ठेवल्या होत्या.