बॉलिवूडची (Bollywood) ‘देसी गर्ल’ (Desi Girl) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. प्रियांका चोप्राने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही (Hollywood) आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. तिने बॉलिवूड सोबतच हॉलिवूडमध्येही स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रियांकाचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे प्रियांका तिचा पती निक जोनस (Nick Jonas) आणि मुलगी मालतीसह (Malti) अयोध्येला (Ayodhya) पोहोचली आहे.
प्रियांका चोप्रा काल (20 मार्च) अयोध्येत पोहोचली आणि रामलल्लाच्या दरबारात तिने हजेरी लावली. ती पहिल्यांदाच अयोध्येला पोहोचली होती. तर प्रियांकाने आपल्या कुटुंबासह रामलल्लाचे दर्शन घेतले आणि पूजा केली.
प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत जेव्हा विमानतळावर उतरली तेव्हा तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विमानतळावरून ती रामलल्लाच्या दरबारात पोहोचली. त्यानंतर तिने सुमारे 20 मिनिटे रामलल्लाचे दर्शन घेतले आणि पूजा केली. यावेळी ती भावूक देखील झाली. भावूक होत प्रियांका म्हणाली की, रामलल्लाला पाहून माझे आयुष्य धन्य झाले आहे. अयोध्येत येणे हा आनंददायी क्षण आहे.
राम मंदिरात प्रियांका आणि तिच्या पतीचे पुजारी प्रदीप दास यांनी रामनामाने स्वागत केले. तसेच राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी त्यांना रामललल्लाचा प्रसाद प्रदान केला.
प्रियांकाने राममंदिर संकुलात पती आणि मुलीसह सुरक्षा कर्मचारी आणि पुजारी यांच्यासोबत फोटो देखील काढले. यावेळी प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि निकने पांढरा कुर्ता पायजमा परिधान केला होता. दरम्यान, सध्या प्रियांका आणि निकचे राम मंदिरातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून कमेंट्स केल्या आहेत.