आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरु होत आहे. यंदा अनेक बदल आपल्याला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून आयपीएलचा महासंग्राम सुरु होणार आहे. पहिल्या आयपीएल सामन्यासाठी चेपॉक स्टेडियम सज्ज झाले आहे. दरम्यान यंदाच्या स्पर्धेत अनेक खेळाडू नवीन संघामधून खेळताना दिसणार आहेत. तसेच ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स हा संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पंड्या आता मुंबईची कमान सांभाळणार आहे. मुंबई इंडियन्सबद्दल थोडे अधिक जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना अहमदाबाद येथे २४ तारखेला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतुत्वातील मुंबईच्या संघाचा हा पहिला सामना असणार आहे. मुंबईची पलटण सध्या आयपीलच्या १७ व्य हंगामात खेळण्यासाठी व ६ व्यांदा विजेतेपदाचा गवसणी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईच्या संघामध्ये क्वेना मफाफा याचा समावेश करण्यात आला आहे.
सूर्यकुमार यादव अनफिट?
मुंबई इंडियन्स संघाचा धमाकेदार फलंदाज समजला जाणारा सूर्यकुमार यादव बंगळुरूमधील एनसीएमधील टेस्टमध्ये अपयशी झाला होता. आता २१ मार्च रोजी म्हणजे आजच फिटनेस टेस्ट होणार आहे. सूर्यकुमारसाठी ही फिटनेस टेस्ट अत्यंत महत्वाची समजली जात आहे. सूर्यकुमार पहिल्या दोन सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.