आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरु होत आहे. यंदा अनेक बदल आपल्याला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून आयपीएलचा महासंग्राम सुरु होणार आहे. पहिल्या आयपीएल सामन्यासाठी चेपॉक स्टेडियम सज्ज झाले आहे. पहिला आयपीएलचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चेपॉक स्टेडियमवरील काही फोटो व्हायरल होत आहेत. उद्या संध्याकाळी सामन्याच्या आधी आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार आहे. दरम्यान या आयपीएल स्पर्धेत सहा वेळी ट्रॉफी जिंकणारा खेळाडू कोणता आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
उद्यापासून आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु होत आहे. पहिला सामना हा चेन्नई विरुद्ध बंगलोर असा होणार आहे. तर १६ हंगामांमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघानी सर्वात जास्त वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबईच्या नावावर ५ विजेतेपद आहेत. २०१३ मध्ये मुंबईने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर २०१५,२०१७,२०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली.
सहा वेळा ट्रॉफी जिंकणारा खेळाडू नक्की आहे तरी कोण?
आयपीलचे आतापर्यंत एकूण १६ हंगाम पूर्ण झाले आहेत. मात्र या ६ स्पर्धांमध्ये एकमेव खेळाडू असा आहे की, ज्याने सहावेळा ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने डेक्कन चार्जर्समध्ये असताना २००९ मध्ये ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली विजेतेपदत पटकावले होते. त्यानंतर २०१३,२०१५, २०१७,२०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सला त्याने विजेतेपद मिळवून दिले आहे. तो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता. यंदा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला ६ वे विजेतेपद जिंकवून देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.