इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर (CSK Vs RCB) यांच्यात खेळवला जाणार आहे. यादरम्यान, आयपीएल 2024 मध्ये अनेक संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. त्याचवेळी बोर्डाने आयपीएल 2024 साठी काही नवीन नियम आणले आहेत.
यावेळी IPL 2024 च्या आधी 3 नियम बदलण्यात आले आहेत आणि BCCI सचिव जय शाह यांनी ICC ने IPL मधून आणलेले क्रिकेटमधील नियम काढून टाकले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने एक नवीन नियम आणला आहे. ज्यामध्ये सामन्यादरम्यान षटकांदरम्यान 60 सेकंदांच्या आत दुसरे षटक सुरू झाले पाहिजे. तसे न झाल्यास नियम न पाळणाऱ्या संघावर 5 धावांचा दंड आकारला जाईल. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी हा नियम आयपीएलमधून काढून टाकला आहे. आयपीएल 2024 मध्ये, जर संघाने षटकांमध्ये 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला, तर त्यानंतरही कोणताही दंड आकारला जाणार नाही.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बीसीसीआयने गोलंदाजाला एका षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर आता आयपीएलमध्येही बोर्डाने हा नियम लागू केला आहे. आता वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये एका षटकात 2 बाऊन्सर टाकू शकतात. त्यामुळे गोलंदाजांना थोडा दिलासा मिळाला आहे.
याशिवाय आयसीसीने स्टंपिंगसाठी अपील करताना कॅच आऊटचा नियम काढून टाकला आहे. पण आयपीएलमध्ये स्टंपिंगसाठी अपील झाल्यास थर्ड अंपायर आधी कॅच आऊट तपासतात. त्याचबरोबर गेल्या हंगामात लागू करण्यात आलेला इम्पॅक्ट नियम या हंगामातही लागू करण्यात आला आहे. तर आयपीएल 2024 मध्ये पूर्वीप्रमाणेच एका डावात संघाला 2 रिव्ह्यू मिळतील.
यंदा आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर (CSK vs RCB) यांच्यातील सामन्याने होणार आहे. सीएसके संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे तर आरसीबी संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे आहे.