दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले तेव्हाच त्यांना अटक होणार अशी कुणकुण कार्यकर्त्यांना लागली होती. अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरी काही वेळ तपास केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना PMLA कोर्टात हजर केले जाणार आहे.
दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने त्यांना याआधी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत तब्बल 9 वेळा समन्स बजावले होते. मात्र केजरीवाल एकदाही चौकशीला हजर राहिले नाहीत.