पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भूतान (Bhutan) दौऱ्यावर पोहोचले आहेत. यावेळी भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे (PM Tshering Tobgay) यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. विमानतळावर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
भूतानच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी राजधानी थिम्पूला पोहोचले आहेत. पीएम मोदींचे भूतानमध्ये आगमन होताच पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “भूतानमध्ये तुमचे स्वागत आहे, माझ्या मोठ्या भावा”, पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
भूतानमध्ये सध्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. भूतानचे लोक विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी रांगोळी काढताना दिसले. भूतानमधील पारो विमानतळावर पंतप्रधान मोदींचे विमान उतरणार असून तेथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
भूतान दौऱ्यात पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेणार आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये भूतानचे पंतप्रधान झालेले शेरिंग तोबगे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला भारताला भेट दिली होती. याशिवाय भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनीही नुकतीच भारत भेट दिली होती. त्यावेळी भूतानच्या राजाने पीएम मोदींना भूतान भेटीचे निमंत्रण दिले होते.