दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले तेव्हाच त्यांना अटक होणार अशी कुणकुण कार्यकर्त्यांना लागली होती. अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरी काही वेळ तपास केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना PMLA कोर्टात हजर केले जाणार आहे.
दरम्यान ,अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीने देखील सावध पावले उचलली आहेत. आमी आदमी पक्षाने केजरीवालांच्या अटकेविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज दुपारनंतर त्यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच ईडीने देखील सावध भूमिका घेत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमचे देखील म्हणणे ऐकावे अशी मागणी या कॅव्हेटमधून ईडीने कोर्टात केली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी याआधी दिल्ली हायकोर्टात ईडीच्या अटकेपासून संरक्षण द्यावे अशी याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने अटकेपासून कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्यास नकार दिल्याने , ईडीने काल रात्री उशिरा केजरीवालांना अटक केली आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने त्यांना याआधी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत तब्बल 9 वेळा समन्स बजावले होते. मात्र केजरीवाल एकदाही चौकशीला हजर राहिले नाहीत. आज केजरीवाल यांना pmla कोर्टात हजर केले जाणार आहे.