दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. काल संध्याकाळी ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले तेव्हाच त्यांना अटक होणार अशी कुणकुण कार्यकर्त्यांना लागली होती. अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरी काही वेळ तपास केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना PMLA कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी देखील होणार होती. मात्र आता याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
काल ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दरम्यान केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात अटकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर ईडीने लगेचच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होणार नाहीये. कारण अरविंद केजरीवाल यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. आता अरविंद केजरीवाल हे हायकोर्टात आपली याचिका दाखल करणार आहेत. त्यानंतर दिलासा न मिळाल्यास ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.