अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेल्या अटकेचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध केला आहे. हे पाऊल भाजपची हतबलता प्रकट करत असून त्यांनी भीतीपोटी जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करवली आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
शुक्रवारी ममतांनी ट्विटरवर याबाबत पोस्ट करत म्हंटले आहे की, माझा केजरीवालांना अटळ पाठिंबा असून मी वैयक्तिकरित्या सुनीता केजरीवाल (अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी) यांच्याशी संपर्क साधला आहे. निवडून आलेल्या विरोधी मुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून लक्ष्य करून अटक केली जात आहे, तर CBI/ED तपासांतर्गत खऱ्या आरोपींना मात्र त्यांचे गैरवर्तन चालू ठेवण्याची परवानगी दिली जात आहे, विशेषत: भाजपशी संलग्न असलेल्यांना ही सवलत दिली जात आहे, हे संतापजनक आहे. तसेच हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे ममता यांनी म्हंटले आहे. .
https://x.com/MamataOfficial/status/1771064819288064290?s=20
ममता पुढे म्हणाल्या की, आज आमची इंडिया आघाडी निवडणूक आयोगाला भेटून केजरीवालांसारख्या विरोधी नेत्यांना, विशेषतः आचारसंहिता लागू झाल्याच्या काळात जाणूनबुजून लक्ष्य करण्यावर आणि अटक करण्यावर आपला तीव्र आक्षेप व्यक्त करणार आहे. यासाठी मी डेरेक ओब्रायन आणि मोहम्मद नदीमुल हर यांना निवडणूक आयोगासोबतच्या या महत्त्वाच्या बैठकीत तृणमूलचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित केले आहे.