आज भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोला आज मोठे यश मिळाले आहे. इस्रोच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनांची यशस्वी चाचणी पार पडली आहे. इस्रोने हे मोठे यश प्राप्त केले आहे. इस्रोने आपले प्रक्षेपण वाहन पुष्पक आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धावपट्टीवर उतरवले आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे इस्रोने हे यश संपादन केले आहे.
https://twitter.com/isro/status/1770998585003512045/photo/1
RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात इस्रोने एक मोठा टप्पा गाठला आहे. यापूर्वीही इस्रोने अशा प्रकारच्या दोन चाचण्या केल्या आहेत. त्या दोन्ही चाचण्या यशस्वी केल्या आहेत. गेल्या वर्षी RLV हे हवाई दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरमधून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित करण्यात आले होते.