नाशिकमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे पत्र नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना पाठविले आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन वळण निर्माण झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या राजकारणामध्ये रोजच नवीन वळणे निर्माण होत आहे. यापूर्वी नाशिक मधून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट मिळू नये, यासाठी म्हणून भाजपच्या एक गट प्रयत्न करत होता. परंतु शिवसेना शिंदे गटाच्या वतीने युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचे नाव घोषित केले. त्यानंतर त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी म्हणून प्रदेश सचिव विजय चौधरी यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारी कोणाला द्यावी यावर एकमत होण्यास तयार नाही महाविकास आघाडी मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाची शिवसेनेला सोडण्यात आली असून त्यासाठी म्हणून त्यांनी विजयी करंजकर यांचे नाव निश्चित केले होते, ते प्रचारालाही लागले परंतु या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आमच्याकडे एका वेळेस दहा जण तयारी करतात असे सांगून कोणत्याही क्षणी नवीन नाव समोर येण्याची शक्यता त्यांनी स्पष्ट केली आहे.
हे सर्व सुरू असतानाच नाशिकच्या लोकसभेच्या जागेसाठी चार साधु महंतांनी आपला दावा सांगितला यामध्ये शांतिगिरी महाराजांचे नाव आघाडी वरती आहे त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.
या सर्व राजकीय घडामोडी सुरू असतानाच नासिक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळावा अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्याने आता नाशिक मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिकांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी स्वतः नाशिक म्हणून उमेदवारी करावी अशी मागणी केली आहे याबाबतचे पत्र राज ठाकरे यांना पाठविण्यात आली असून त्यामध्ये कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की जर राज ठाकरे या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असतील तर त्यांच्या विजयासाठी सर्व मनसैनिक हे एक दिल्याने काम करतील त्यामुळे त्यांनी या ठिकाणी उमेदवारी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघ हा एक इतिहासात वेगळं महत्त्व असलेला मतदारसंघ आहे या ठिकाणाहून राज ठाकरे यांनी उमेदवारी केली तर कार्यकर्त्यांना आनंदच वाटेल आणि सर्व जनतेचे स्वागत करतील आणि वेळप्रसंगी राज ठाकरे यांची बिनविरोध निवडणूक देखील होऊ शकते. – सुदाम कोंबडे, जिल्हा अध्यक्ष, मनसे