रणदीप हुडा निर्मित केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट काल रिलीज झाला आहे. दरम्यान या चित्रपटासाठी रणदीप हुडाने आपले ३० किलो वजन कमी केले होते. या चित्रपटामध्ये रणदीप हुंडा याने स्वतातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडा याने खूप मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे. या बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हा चित्रपट काल बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून, पहिल्या दिवशी हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात थोडासा मागे पडल्याचे दिऊन आले. रणदीप हुडाच्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १.१५ कोटींची कमाई केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडाने २६ ते ३० किलो वजन कमी केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याने एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.
स्वातंत्र्यवीर वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांचे यांनी खुलासा केला की, सेल्युलर जेलमध्ये असताना रणदीपने दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांसारखे दिसण्यासाठी आणि वाटण्यासाठी ३० किलो वजन कमी केले होते. भूमिकेबद्दलच्या समर्पणाबद्दल त्यांनी अभिनेत्याचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यसैनिकाची कथा मोठ्या पडद्यावर साकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले.