परवा ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना PMLA कोर्टात हजर करण्यात आले होते. ईडीने केजरीवालांच्या १० दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली होती. कोर्टामध्ये तब्बल तीन तास युक्तिवाद झाला. त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला व काही वेळानंतर केजरीवालांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने ९ समन्स पाठवून सुद्धा ते हजर न राहिल्याने ईडीने न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून सुनीता म्हणाल्या, “मी खूप संघर्ष केला आहे, मला या अटकेने आश्चर्य वाटले नाही. भारताच्या आत आणि बाहेर अनेक शक्ती आहेत ज्या देशाला कमकुवत करत आहेत. आपण सावध असले पाहिजे, या शक्ती आपण त्यांना ओळखून पराभूत करावे लागेल. दिल्लीतील महिला विचार करत असतील की केजरीवाल तुरुंगाच्या आत आहेत. त्यांना १,००० रुपये मिळतील की नाही कोणास ठाऊक. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या भावावर, त्यांच्या मुलावर विश्वास ठेवावा. मला कोणतेही तुरुंग आत ठेवू शकत नाही. मी बाहेर येईन आणि माझे वचन पूर्ण करेन.
दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. काल रात्री त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज त्यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात आता केजरीवाल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ईडी आता केजरीवाल यांच्याविरुद्ध हेरगिरीचा गुन्हा देखील दाखल करण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांना केजरीवालांच्या घरी १५० पानांचे दस्तऐवज सापडले असल्याचे समजते आहे. या दस्तऐवजात ईडीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा १५० पानांचा तपशीलवार अहवाल आहे. हे दोन्ही अधिकारी सहसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत.