काल संध्याकाळी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाला असून त्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी,22 मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये गोळीबार आणि स्फोट घडवून आणला आहे. या भ्याड दहशतवाडी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी ११ जणांना ताब्यात घेतले आहे.
रशियाची राजधानी मास्को येथे आज दहशष्ट्वादी हल्ला झाला. यामध्ये ९० पेक्षा जास्त नागरिक ठार झाले. त्यानंतर तेथील सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरु केली आणि ११ जणांना ताब्यात घेतले आहे. ११ जणांमध्ये ४ असे आरोपींचा देखील समावेश ज्यांनी घटनास्थळावर गोळीबार केला होता. रशियन सैन्याने ब्रांस्क या ठिकाणावरून या आरोपीना ताब्यात घेतले आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या प्रमुखांनी शनिवारी देशाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले की, मॉस्कोमधील कॉन्सर्टच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था टासने ही माहिती दिली. या हल्ल्यात ९३ जणांचा मृत्यू झाला असून १४५ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी घुसून तेथे उपस्थित लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी समारंभाचे ठिकाण पेटवून दिले. इस्लामिक स्टेटने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रशियामध्ये गेल्या काही वर्षांतील हा सर्वात भीषण हल्ला आहे.
५ सशस्त्र दहशवाद्यांनी क्रोकस सिटी हॉलमध्ये संध्याकाळी ६. ३० च्या सुमारास प्रवेश केला आणि मैफिल सुरू होण्यापूर्वी गोळीबार केला. वृत्तानुसार, हॉलमध्ये गोळीबार केल्यानंतर ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. 15 ते 20 मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये 40 टक्के भाग जळून खाक झाला.