जागतिक हवामान दिन दरवर्षी २३मार्च रोजी साजरा केला जातो. हवामान शास्त्रा बरोबरच त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरुक करणे हा त्या मागील हेतू आहे. दरवर्षी त्या साठी एक थीम सेट केली जाते.या थीमच्या आधारे वर्षभर काम केले जाते.
निसर्गचक्रात वर्षानुवर्ष बिनचूकपणे होणा-या घटनांपैकी एक म्हणजे १ जूनला भारतात दाखल होणारा मान्सूनचा पाऊस. परंतु गेल्या काही वर्षात जगभरात नैसर्गिक नियमितता नाहीशी होऊन अनपेक्षित बदलांचे प्रमाण वाढत आहे. हवामानातील हे बदल आणि त्यांचे परिणाम ग्लोबल असले तरी त्यावरच्या उपाययोजना लोकल (स्थानिक) स्वरूपातही करता येतात .
१९५० साली जागतिक हवामानशास्त्र संघटना (WM WMO) स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्या-या ३१ देशांत भारत ही होता. यानंतर जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणा-या हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. कारण स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो हे आपल्या ध्यानात आले.
हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक -नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था १९५० मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे आहे.
जागतिक हवामान दिनाचे महत्त्व –
हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे मानवी साधनसंपत्तीचे तर नुकसान होतेच; शिवाय अनेकांचा मृत्यूही ओढवतो. इतर प्राणी – पक्षीही यातून सुटत नाही. कारण जगातील एका भागचे हवामान इतर ठिकाणांहून भिन्न असू शकत नाही तर एका घटकातील बदलाचा परिणाम इतर घटकांवर झालेला आढळतो. हवामानावर लक्ष ठेवणारी ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली आजही सुरु असून ती आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक मानली जाते. हवामानातील बदल. त्यामागील कारणे व उपाय याबाबी सरकारपासून सर्वसामान्यंपर्यंत प्रत्येकाने समजून घेण्याची तातडीची गरज आज निर्माण झाली आहे.
जागतिक हवामान दिन हा आपल्या पृथ्वीला भेडसावणाऱ्या हवामान बदल, जंगलतोड, अति प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग इ. अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे.
पर्यावरणीय स्थितीबद्दल जागरूकता वाढवण्याच्या अनुषंगाने, या दिवसाचे महत्व आहे. योग्य वेळी खबरदारी आणि पावले उचलल्यास पृथ्वी वरील अनेक जीव वाचू शकतात.
जागतिक हवामान दिनाची थीम दरवर्षी वेगवेगळी ठरवण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षी म्हणजे २०२३ या वर्षाची थिम “The Future Of Weather , Climate And Water Across Generations “ म्हणजे “पिढ्यानपिढ्या हवामान आणि पाण्याचे भविष्य”अशी होती .
डॉ. सौ. श्रध्दा शिरीष कुलकर्णी , मंगळवेढा.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत