भारतीय नौदल सध्या जगातील सर्वोत्तम नौदलांपैकी एक समजले जाते. हिंद महासंग आणि अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा दबदबा कायम आहे. नुकतेच १६ मार्च रोजी भारतीय नौदलाने एका व्यापारी जहाजाला समुद्री चाच्यांपासून सोडवले आहे. त्यांची त्यांच्या तावडीतून मुक्तता केली आहे. एमव्ही रुईन या जहाजाला भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवले आहे. तसेच ३५ समुद्री चाच्यांना देखील ताब्यात घेतले आहे. औपचारिक रुटीन पूर्ण करून या ३५ जणांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे की, चाचेगिरीविरोधी मोहिमेअंतर्गत नौदलाने भारतीय किना-यापासून २६०० किलोमीटर दूर असलेल्या समुद्री चाच्यांवर कारवाई करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. सुमारे ४० तास चाललेल्या या कारवाईत नौदलाच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा युद्धनौका, ड्रोन आणि मरीन कमांडो सहभागी झाले होते. नौदलाचे हे ऑपरेशन तब्बल ४० तास चालले होते.
नौदलाने सांगितले होते की, ऑपरेशनचा एक भाग म्हणून हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टच्या मदतीने मार्कोस कमांडोना भारतीय किनारपट्टीपासून २,६०० किलोमीटर दूर अरबी समुद्रात सोडण्यात आले. याशिवाय मार्कोस कमांडोसाठी अनेक खास बोटीही अरबी समुद्रात सोडण्यात आल्या होत्या. या बोटींच्या मदतीने भारतीय मार्कोस कमांडोने एमव्ही रौन या अपहरण केलेल्या व्यापारी जहाजावर चढून तेथे कारवाई करून समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.