2024 च्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) रणसंग्राम वाजला आहे. निवडणूक आयोगानेही तारखा जाहीर केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाने (BSP) उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
बसपा प्रमुख मायावती यांनी सहारपूरमधून माजिद अली, कैरानामधून श्रीपाल सिंग, मुझफ्फरनगरमधून दारा सिंग प्रजापती यांना लोकसभा निवडणुकीत बसपाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
नगीना आरक्षित जागेवरून सुरेंद्र पाल सिंग, मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी, रामपूरमधून जीशान खान, संभलमधून शौलत अली, अमरोहामधून मुजाहिद हुसेन, मेरठमधून देवव्रत त्यागी यांना उमेदवारी देण्यात आळी आहे.
आरएलडीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बागपतमधून बसपाने प्रवीण बन्सल यांना उमेदवारी दिली आहे, तर गौतम बुद्ध नगरमधून राजेंद्र सिंह सोलंकी, बुलंदशहरमधून गिरीशचंद्र जाटव, आमलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनीस अहमद खान आणि शाहजहांपूरमधून दोद्रम वर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.