आयपीलचा १७ व हंगाम २२ तारखेपासून सुरु झाला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये काल सामना पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात गुजरातने मुंबईला ६ धावांनी पराभूत केले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना अखेर शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने जिंकला आहे. यंदा मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपविण्यात आली आहे. हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाची आणि मुंबई या हंगामातील सुरुवात ही पराभवाने झाली आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईला १६९ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र मुंबईला हे आव्हान पार करताना ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. सुरुवातीला रोहित शर्माने आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी चांगली भागीदारी करून मुंबईला विजयाच्या जवळ नेले होते. मात्र त्यानंतर इतर फलंदाजानी चांगली कामगिरी न केल्याने मुंबईला लक्ष्य गाठता आले नाही.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजानी कच खाल्ली. तिलक वर्मा, टीम डेव्हिड , हार्दिक पंड्या आणि इतर फलंदाज जास्त चमकदार कामगिरी दाखविली नाही. त्यामुळे मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज इलेव्हन या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. दरम्यान या आयपीलच पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झाला. यामध्ये चेन्नईला विजय तर बंगलोरला पराभव स्वीकारावा लागला होता. २०१३ नंतर मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील पहिला सामना जिंकता आलेला नाहीये.