तापसी पन्नू ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. ती अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेले कित्येक दिवस अभिनेत्री तापसी पन्नू ही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान आज तापसी पन्नू आज अखेर विवाहबंधनात अडकली आहे. तापसीने उदयपूर येथे गुपचूप पद्धतीने आपला विवाहसोहळा साजरा केल्याचे वृत्त समोर आले आहे. जवळचे नातेवाईक आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे. मॅथियास बो आणि तापसी पन्नू यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. गेली अनेक वर्षे ही दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. मॅथियास बो हा भारतीय बॅडमिंटन दुहेरी संघाचा कोच आहे.
तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांचा विवाह सोहळा अतिशय खाजगी असा होता. तसेच २० तारखेपासून लग्नासंबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडिया आणि मीडियामध्ये आपल्या लग्नाची चर्चा होऊ नये यासाठी या जोडप्याने खबरदारी घेतल्याचे दिसून आले. तापसी पन्नूचा प्रियकर हा मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. सध्या तो भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तापसी पन्नू ही केवळ हिंदी नव्हे तर तेलगू आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मॉडेलिंगपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.