उज्जैनच्या (Ujjain) महाकाल (Mahakal) मंदिरात मोठा अपघात झाला आहे. महाकाल मंदिरात भस्म आरती सुरू असताना अचानक आग (Fire) लागली. या आगीत 13 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मंदिरातील सेवकांचा आणि पुजाऱ्यांचा समावेश आहे. तर आता या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पीएम मोदींनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले की, उज्जैनच्या महाकाल मंदिरात घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. होळीच्या उत्सवादरम्यान महाकाल मंदिरात आग लागल्याची बातमी ऐकून दुःख झाले. या दुर्घटनेत जखमी झालेले भक्त आणि पुजारी यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो यासाठी मी प्रार्थना करतो. तसेच राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे.
दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची दखल घेत दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाकाल मंदिरात भस्म आरती सुरू असताना अचानक आग (Fire) लागली. या आगीत 13 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मंदिरातील सेवकांचा आणि पुजाऱ्यांचा समावेश आहे. सुदैवाने या आगीवर नियंत्रणत मिळवण्यात यश आलं आहे. या आगीत मंदिरातील भस्मारतीचे मुख्य पुजारी संजय गुरू, मनोज पुजारी, विकास पुजारी, अंश पुरोहित, चिंतामण गेहलोत आणि सेवक महेश शर्मा यांच्यासह अनेज जण जखमी झाले आहेत. सध्या या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या आगीत आरतीसाठी उपस्थित असलेल्यांपैकी 13 जण जखमी झाले असून त्यामध्ये पुजाऱ्यांचाही समावेश आहे. सुदैवानं यात कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच या घटनेनंतर मंदिर दर्शन व्यवस्थित सुरू असून कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही, अशी माहिती उज्जैनचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.