रणदीप हुडा निर्मित केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट काल रिलीज झाला आहे. दरम्यान या चित्रपटासाठी रणदीप हुडाने आपले ३० किलो वजन कमी केले होते. या चित्रपटामध्ये रणदीप हुंडा याने स्वतातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडा याने खूप मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे. या बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हा चित्रपट काल बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने किती कमाई केली आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर हा एक बायोपिक आहे. रणदीप हुडा याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. खरा इतिहास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. २२ मार्च रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बायोपिक असणाऱ्या सिनेमाने तीन दिवसांमध्ये सहा कोटींची कमाई केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून, पहिल्या दिवशी हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात थोडासा मागे पडल्याचे दिऊन आले. रणदीप हुडाच्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १.१५ कोटींची कमाई केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडाने २६ ते ३० किलो वजन कमी केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याने एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.