सध्या सर्वत्र होळीचा (Holi) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये आता अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरातही (Ram Mandir) आज (25 मार्च) भव्य होळी उत्सव साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे आज रामलल्लाची पहिली होळी आहे. त्यामुळे अयोध्येत मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
आज होळीनिमित्त सकाळीच विविध ठिकाणच्या लोकांनी मंदिरात गर्दी केली होती. तर अयोध्येतील राम मंदिरात होळी साजरी करताना प्रभू रामलल्लांना गुलाल लावण्यात आला होता.
रामभक्तांच्या उत्साहाने संपूर्ण रामजन्मभूमी परिसर रंगांच्या उत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघाला होता. राम मंदिराच्या प्रांगणात पुजाऱ्यांनी मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. यासोबतच रागाचा भोग व अलंकाराचा भाग म्हणून रामलल्लाला अबीर-गुलाल अर्पण करण्यात आला. तसेच कचोरी, गुझिया, पुरी, खीर असे खास पदार्थ रामलल्लाला अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रभू रामाला रंग चढवल्यानंतर पुजाऱ्यांनी भाविकांमध्ये फुलांचा वर्षाव केला आणि फुलांनी होळी खेळली.
रामलल्लाला प्रसन्न करण्यासाठी पुजाऱ्यांनी भाविकांसह होळीची गाणी गायली आणि मूर्तीसमोर नृत्य केले. रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, “राम मंदिरात अभिषेक झाल्यानंतर पहिली होळी साजरी केली जात आहे. रामलल्लाच्या आकर्षक मूर्तीला फुलांनी सजवण्यात आले आणि कपाळावर गुलाल लावण्यात आला आहे.”
https://twitter.com/ShriRamTeerth/status/1772133222278668535
दरम्यान, सध्या राम मंदिरातील रामलल्लाच्या पहिल्या होळीचे काही खास फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.