देशामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच भाजपा आणि अनेक इतर पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान भारतीय वायू सेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल आरके. एस. भदोरिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
दरम्यान भारतीय वायू सेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल आरके. एस. भदोरिया यांनी आज भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. आरकेएस भदोरिया हे २०२१ मध्ये वायू सेना प्रमुख या पदावरून निवृत्त झाले. राफेल विमान भारताला मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
भाजपा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मतदार संघातून भाजपा भदोरिया यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. सध्या जनरल व्हीके सिंह हे विद्यमान खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये जनरल व्हीके सिंह हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये गाझियाबाद्च्या जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे कदाचित भाजपा वायू सेनेचे माजी प्रमुख आरकेएस भदोरिया यांना लोकसभेचे तिकीट देण्याची शक्यता आहे.