आरसीबीने (RCB) अखेर आपले खाते खोलले आहे. विराट कोहली (Viart Kohli) आणि दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) दमदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने त्यांच्या घरच्या मैदानावर चिन्नास्वामीवर पंजाब किंग्जविरुद्धचा सामना 4 गडी राखून जिंकला. यासह आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये विजयाचे खाते उघडले आहे.
IPL 2024 च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) विरुद्ध झाला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव करत या मोसमातील पहिला सामना जिंकला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 6 गडी गमावून 176 धावा केल्या. संघातर्फे कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या, तर जितेश शर्माने 27 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये शशांक सिंगने चांगली फलंदाजी करत अवघ्या 8 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. गोलंदाजीत आरसीबीकडून सिराज आणि मॅक्सवेलने 2-2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात विराट कोहलीने आरसीबी संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण फाफ डू प्लेसिस लगेचच बाद झाला. त्यानंतर अनुज रावतने 11 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली (77) आणि अनुज रावत यांच्या विकेट्स पडल्यानंतर क्षणभर असे वाटले की हा सामना पंजाबच्या हातात आहे, पण दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात सामना फिरवला.
कार्तिकने शेवटच्या दोन षटकांमध्ये अप्रतिम खेळी खेळली आणि आरसीबीला 4 विकेट्सने विजय मिळवून दिला. पहिला सामना गमावल्यानंतर, RCB संघाने IPL 2024 मध्ये पहिला विजय मिळवला. पंजाबच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असली तरी दबावामुळे त्यांना सामना जिंकता आला नाही. दिनेश कार्तिकने या सामन्यात 10 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 28 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 280 होता.