पाकिस्तान हा देश हा दहशतवाद्यांचा गड समजला जातो. पाकिस्तान भारताविरुद्ध अनेक नापाक कारवाया करत असतो. मात्र दहशतवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानमध्येच आता दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नावाचा प्रांत आहे. त्या ठिकाणी काल रात्री सोमवारी तुरबत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि नौदलाच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पीएनएस सिद्दीकी हा पाकिस्तानचा सर्वात दुसरा मोठा नौदल एअरबेस आहे. चार दहशतवाद्यांनी या एअरबेसवरच हल्ला सुरु केला.
तुरबत येथे पीएनएस सिद्दीकी या नौदलाच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. तिथे अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडने तुरबत विमानतळावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मजीद ब्रिगेडने नेहमीच बलुचिस्तान प्रातांमध्ये चिनी गुंतवणुकीच्या विरोध केला आहे. चीन व पाकिस्तान या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मनमानी पद्धतीने करत असल्याचा आरोप मजीद ब्रिगेड करत आली आहे.
एकाच आठवड्यामध्ये मजीद ब्रिगेडने हा दुसरा हल्ला केला आहे. या वर्षातील हा तिसरा हल्ला आहे. २० पाकिस्तानच्या ग्वादार बंदरावर असाच हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी शहीद झाले होते. बलुचिस्तानच्या माहितीनुसार, कालच्या हल्ल्यात दहशतवाडी एअरबेसवॉर घुसल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यानंतर त्यांनी अनेक स्फोट आणि अंदाधुंद गोळीबार सुरु केला मात्र यामध्ये त्यांना फार यश आले नाही.