लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी काँग्रेसबाबत एक विधान केले आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला. तसेच केवळ गांधी परिवाराच काँग्रेस पक्षाला एकत्रित ठेवू शकतो असे शिवकुमार म्हणाले आहेत.
जेव्हा काँग्रेस कठीण काळातून जात होती तेव्हा, सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये देशात काँग्रेसची सत्ता आणली होती. एनएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवकुमार म्हणाले, ”सोनिया गांधी सरकार आणण्यात यशस्वी झाल्या. काँग्रेस खूप कठीण परिस्थितीमध्ये होती. त्यानंतर सोनिया गांधींनी काँग्रेसला सरकारमध्ये परत आणले. त्यानंतर त्यांनी मनमोहन सिंह यांना पंतप्रधान केले. सोनिया गांधी पंतप्रधान व्हाव्यात अशी युपीएच्या खासदारांची इच्छा होती. मात्र त्यांनी या पदाचा त्याग केला. हा जगातील सर्वात मोठा त्याग आहे. देशासाठी त्यांनी मनमोहन सिंह यांचे नाव पुढे केले. गांधी परिवाराने केलेला हा सर्वात मोठा त्याग आहे. ”