आज (27 मार्च) ठाकरे गटानं (Thacekray Group) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 17 जागांवरच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर यावेळी चंद्रकांत खैरे यांना औरंगाबादमधून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. (Thackeray Group Candidtes List)
उमेदवारांची यादी जाहीर करताना संजय राऊत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे :
1. बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
2. यवतमाळ – श्री. संजय देशमुख
3. मावळ – श्री. संजोग वाघेरे-पाटील
4. सांगली – श्री. चंद्रहार पाटील
5. हिंगोली – श्री. नागेश पाटील आष्टीकर
6. संभाजीनगर – श्री. चंद्रकांत खैरे
7. धाराशीव – श्री. ओमराजे निंबाळकर
8. शिर्डी – श्री. भाऊसाहेब वाघचौरे
9. नाशिक – श्री. राजाभाऊ वाजे
10. रायगड – श्री. अनंत दाते
11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी – श्री. विनायक राऊत
12. ठाणे – श्री. राजन विचारे
13. मुंबई-ईशान्य – श्री. संजय दिना पाटील
14. मुंबई-दक्षिण – श्री. अरविंद सावंत
15. मुंबई दक्षिण मध्य – श्री अनिल देसाई
16. मुंबई-वायव्य – श्री. अमोल किर्तीकर
17. परभणी – श्री संजय जाधव
ठाकरे गटाकडून विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, अरविंद सावंत, संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसने मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या दोन जागांवर दावा केला होता. मात्र, आता ठाकरे गटाने अनिल देसाई आणि अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देत त्या जागा आपल्याकडे घेतल्या आहेत.