आत्तापर्यंत तुम्ही लॉकरमध्ये, भांड्यात किंवा भिंतीच्या आत दडवलेले पैसे पाहिले असतील, पण तुम्ही कधी कोणी वॉशिंग मशीनमध्ये पैसे लपवलेले पाहिले आहेत का? कारण आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी परकीय चलनाच्या कथित उल्लंघनाच्या प्रकरणाच्या संदर्भात विविध शहरांमध्ये केलेल्या झडतीदरम्यान ‘बेहिशेबी’ रोख रक्कम 2.54 कोटी जप्त केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रकमेतील काही भाग ‘वॉशिंग मशीन’मध्ये सापडला आहे.
ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, कॅप्रिकॉर्नियन शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक विजय कुमार शुक्ला, संजय गोस्वामी आणि त्यांच्या इतर कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.
तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या संबंधित कंपन्यांमध्ये लक्ष्मीटन मेरीटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टुअर्ट अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील्स लिमिटेड, वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक/भागीदार संदीप गर्ग, विनोद केदिया यांचा समावेश आहे.
ईडीच्या तापासात समोर आले आहे की, संबंधित कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भारताबाहेर विदेश चनल पाठवल्याचे निदर्शनास आले आहे. हे परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन आहे. तसेच ईडीच्या छाप्यादरम्यान कॅप्रिकॉर्नियन शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि लक्ष्मीटन मेरीटाइम या शेल कंपन्यांच्या मदतीने बनावट मालवाहतूक आणि इतर कामांच्या नावाखाली सिंगापूरस्थित संस्थांना 1800 कोटी रूपये दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता ईडीने संबंधित कंपन्यांची 47 बँक खाती गोठवली आहेत जेणेकरून त्यांना कोणताही व्यवहार करता येणार नाही.