लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजणे चांगलीच तयारी सुरु केली आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालची स्टार प्रचारकांची घोषणा करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. भाजपाने या यादीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा देखील समावेश केला आहे.
भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे. यात राज्यातील काही नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय मंत्री नियतन गडकरी, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये या तिघांवर प्रचाराची जबाबदारी असणार आहे. तसेच ते इतर राज्यांमध्ये देखील जाऊन प्रचार करणार आहेत. फडणवीसांची मध्य प्रदेशात स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती इराणी आणि मनोज तिवारी यांची नवे देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये देण्यात आली आहेत.