प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही जास्त चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून आदितीचे नाव प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थसोबत (Siddharth) जोडले जात आहे. अशातच आता अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न केल्याची बातमी समोर येत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी तेलंगणातील वनपार्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरमइथल्या रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं आहे. तसंच त्यांच्या लग्नसोहळ्याला फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
असे म्हटले जात आहे की, अदिती आणि सिद्धार्थने त्यांच्या पारंपारिक रितीरिवाजानुसार लग्न केले आहे, ज्यामध्ये तामिळनाडूतील पुजारी बोलावण्यात आले होते. दरम्यान, अदिती आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये. पण लवकरच ते दोघं त्यांच्या लग्नाबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याचं समजतंय.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे दोघं 2021 मध्ये ‘महा समुद्रम’च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्या दोघांनी अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तसंच गेल्या वर्षी या अदितीच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने तिच्यासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून त्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांवर चाहत्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं.
दरम्यान, अदितीने यापूर्वी सत्यदीप मिश्रा नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले होते. दोघांनी 2009 मध्ये लग्न केलं होतं पण चार वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. तर सिद्धार्थने 2003 मध्ये लग्न केलं होतं, मात्र ते लग्न फार काळ टिकलं नाही. त्याने 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता.