किआ कंपनी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असलेले मॉडेल्स भारतीय बाजारात लॉन्च करत असते. कॉम्पॅक्ट एसयूव्ही मार्केटमध्ये किआ सॉनेट हे मॉडेल आपल्या डिझाईन, फीचर्स, प्रीमियम ड्रायव्हिंग फीचर्स या सर्व गोष्टींमुळे ग्राहकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक व्हेरिएंटमध्ये ही गाडी खरेदी करता येते. मात्र सध्या किआ कंपनीच्या सोनेट HTK+ व्हेरिएंटला सर्वात जास्त मागणी असलेली पाहायला मिळत आहे. यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी, फीचर्स यांचे एकत्रित अनुभव ग्राहकांना देण्यात आला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सोनेट HTK+ मध्ये १.२ लिटरचे बीएस सिक्स इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८२ बीएचपी पॉवर जनरेट करते. याला ५ -स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. यात तुम्हाला अधिक चांगले मायलेज देखील मिळते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी यात ६ एअरबॅग्स, हिल होल्ड कंट्रोल, ब्रेक असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असे सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
सोनेट HTK + मध्ये ग्राहकांना नवीन फीचर्स, आधुनिक अपडेट्स देखील मिळणार आहे. वाहन चालवताना ग्राहकांना आनंद मिळणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात पार्किंग सेन्सर आणि रिअर कॅमेरासेटअप देण्यात आले सेटअप देण्यात आले आहे. की- लेस स्टार्ट करता येणार आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही ९.९० लाख रुपये इतकी आहे.