काल आयपीएलच्या स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव केला.आयपीएलच्या स्पर्धेतील हा ७ वा सामना होता. या सामन्यात चेन्नईने गुजरातवर विजय प्राप्त केला आहे. चेन्नईच्या संघाने आपला सलग दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकत चेन्नईला बॅटिंगसाठी निमंत्रित केले होते. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात चेन्नईने २०६ इतकी धावसंख्या उभारली होती. मात्र या सामन्यात शुभमन गिलला आयपीएलच्या एका समितीने दंडात्मक कारवाई केली आहे.
चेन्नई आणि गुजरात सामन्यात गुजरातने ओव्हर्समधील वेळ न पाळल्यामुळे आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट कमिटीने कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेट प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कालचा सामना हा चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला होता. १७ व्य हंगामात स्लो ओव्हर रेट साठी दंडात्मक कारवाई होणार गिल हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. गिलला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
आज मुंबई-हैद्राबाद सामना
आज आयपीएलच्या स्पर्धेत पाच वेळा स्पर्धा जिंकलेले मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचा तर पॅट कमिन्स हैद्राबाद संघाचा कर्णधार आहे. दोन्ही संघ आपले पहिले सामने पराभूत होऊन आले आहेत. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सच्या सामन्यात हार पत्करावी लागली. तर हैद्राबाद संघाला कोलकाता संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. सूर्यकुमार यादव अजूनही फिट नसल्याने तो अजून एका सामन्याला मुकणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैद्राबाद येथे हा सामना होणार आहे.