Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad: काल आयपीएलच्या १७ व्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड तयार झाले आणि अनेक रेकॉर्ड मोडले गेले आहेत. कारण कालच्या सामन्यात ५०० पेक्षा जास्त धावा झाल्याचा रेकॉर्ड झाला आहे. तर हैद्राबादने मुंबईवर ३१ धावांनी विजय प्राप्त केला आहे. हैदराबादने या स्पर्धेत आपला पहिला विजय प्राप्त केला असून मुंबईला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेण्यात.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या हा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डिंगसाठी पळवत आहे असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हार्दिकने रोहितला बाऊंड्री लाईनवर अनेकदा धावायला लावले होते. या व्हिडीओवरून हार्दिक पंड्या प्रचंड मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता. रोहित शर्माबरोबर असे लागल्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. मात्र कालच्या हैद्राबादच्या सामन्यात रोहित शर्माने आपली ताकद दाखवली आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसला आणि हार्दिकला बरंच काही समजावतानाही दिसला. मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवानंतरही रोहित टीम मालक आकाश अंबानी आणि कर्णधार हार्दिकसोबत बराच वेळ बोलत होता.तर काल हैदराबादने रॉयल चॅलेंजर्सचा २६३ चा रेकॉर्ड मोडला आहे. अव्वल फलंदाजांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने बुधवारी येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन गडी गमावून २७७ धावा केल्या, हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील एक नवा विक्रम आहे.