कॅश फॉर क्वेरी प्रकरणात टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा (Mahuaa Moitra) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई करत सीबीआयने (CBI) गुरुवारी (21 मार्च) मोईत्रा यांच्या विरोधात एफआयआर (FIR) नोंदवले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्या महुआ मोईत्रा यांना फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) प्रकरणात समन्स जारी केले. ईडीने तिला 28 मार्च म्हणजे आजच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र टीमशी नेत्या महुआ मोईत्रा या आज चौकशीसाठी हजर राहणार नसून, त्या प्रचारासाठी मतदारसंघात जाणार आहेत. महुआ मोईत्रा या कृष्णनगर मतदारसंघात प्रचार करणार आहेत.
पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्यामुळे खासदार महुआ मोईत्रा यांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर सीबीआयने देखील त्यांच्या एफआयआर नोंदवले आहे. दरम्यान आज सीबीआयने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सीबीआयने चौकशीसाठी रोख रकमेप्रकरणी महुआ मोईत्राविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. लोकपालच्या निर्देशानुसार केंद्रीय एजन्सीने ही कारवाई केली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
या प्रकरणातील सीबीआयने प्राथमिक तपास केल्यानंतर लोकपालने एजन्सीला सूचना दिल्या. त्याअंतर्गत मोईत्राविरुद्धच्या तक्रारींची सर्व बाजू तपासल्यानंतर सहा महिन्यांत निष्कर्ष सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात महुआ मोईत्रा यांना समन्स जारी केले होते. तसेच न्यायालयाने मोइत्रा यांना उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी न्यायालयाने अनेक माध्यम संस्थांना समन्सही बजावले आहेत.