भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सीआर केसवन यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.केशवन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू आहेत.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केशवन यांची भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती तत्काळ प्रभावाने मंजूर केली आहे.
वैचारिक कारणास्तव काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर एप्रिल 2023 मध्ये केशवन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर केशवन यांनी ही जबाबदारी सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांचे आभार मानले.
गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केशवन म्हणाले की, जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
इंडी आघाडी ही द्वेषाच्या विचारसरणीचा प्रचार करते आणि ध्रुवीकरणाचे राजकारण करते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचारमुक्त कारभार. मोदींच्या हमीने जनतेचा विश्वास संपादन केला असून येत्या निवडणुकीत ‘यावेळी आम्ही 400 पार करू’ हे देशातील जनताच घडवून आणेल. याची मला खात्री आहे.