(Mukhtar Ansari) तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशातील माफिया आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा तीव्र हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बांदा जेलमध्ये मुख्तार अन्सारीची तब्येत बिघडली त्याला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल करताच अन्सारीचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही तासांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.14 तास मुख्तार अन्सारीवर उपचार करण्यात आले मात्र, तो वाचू शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्तारला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर 9 डॉक्टरांची टीम उपचार करत होती. मात्र, तरिही तो वाचू शकलेला नाही.
मुख्तार अन्सारीवर 65 पेक्षा जास्त केस दाखल होत्या. यात 21 डिसेंबर 2022 ला पहिल्यांदा त्याला शिक्षा झाली होती. दोन केसमध्ये मुख्तार अन्सारीला जन्मठेप झाली होती तर 17 महिन्यांमध्ये त्याला 8 वेळा शिक्षा झाली.