पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे बजरंग दलाच्या तीन कार्यकर्त्यांवर
जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तीन कार्यकर्त्यांवर आरोपींनी अत्यंत घातक अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला
संध्याकाळी सहाच्या सुमारास हॉटेल स्वाद जवळ करण्यात आला. बजरंग दलाच्या
कार्यकर्ते दादा काळे, करण थोरात, सुनील नेप्ते हे गप्पा मारत असतांना
अचानक चार ते पाच आरोपींनी त्यांना रामनवमी
का साजरी करतात? असं म्हणून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. जिहाद्यांनी केलेल्या
हल्ल्यामध्ये हे बजरंग दलाचे हे तीनही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या
हल्ल्यामध्ये तिघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर भिगवण येथील यशोधरा
हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांकडून जिहाद्यांवर अद्यापही कुठलीही कारवाई
करण्यात आलेली नाही आहे! पोलिस प्रशासन यावर कारवाई करण्यात एवढा वेळ का घेत आहे?
असा
प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत
आहे.